अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज, सोमवारी ईडी कार्यालयात हजेरी लावली. यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘तपास यंत्रणापासून दूर जाता येत नाही. पाच-पाच समन्स दिल्यानंतरसुद्धा अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. हायकोर्टात, सुप्रिम कोर्टात दिलासा मिळेल असा त्यांचा प्रयत्न होता. कारवाईला स्थगिती मिळेल, असं त्यांना वाटत होतं. पण कोणत्याच कोर्टानं त्यांना स्थगिती दिली नाही. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. त्यांना आज ईडीसमोर हजर राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालेय की, माणूस कितीही मोठा असला तरी कायद्याचं पालन करत यंत्रणासमोर जावेच लागते.’ पाच समन्स दिल्यानंतरही ईडीच्या कारवाईला रिस्पॉन्स करत नसतील, तर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्यामुळे अलिकडील काळात ईडीचीही मस्करी करायला लागले. पण शेवटी तपास यंत्रणेनं दाखवून दिलं की कायद्यापेक्षा यंत्रणेपेक्षा कुणीही मोठं नाही. न्यायालयातही प्रयत्न करण्यात आले, पण दिलासा मिळाला नाही. शेवटी कायद्यासमोर झुकावं लागलं, असे प्रविण दरेकर म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:15 PM 01-Nov-21
