‘हे घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात, नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही’

0

दिवाळीनंतर राज्यातील तीन मंत्री आणि तीन जावई यांचे घोटाळे बाहेर काढणार असं किरीट सोमय्या यांनी रविवारी ट्विट करत सांगितले होते. मात्र, नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही पत्रकार परिषद घेत आरोपांची मालिका सुरु केली आहे. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला. ते म्हणाले, पवार कुटुंबाचे जावई मोहन पाटील यांच्याकडे किती पैसे आले? कुठून पैसे आले? कसे आले? ते कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. सहा फटाक्यापैकी पहिला फटाका आज फोडलाय, हिंमत असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी समोरासमोर उत्तर द्यावं, असे यावेळी सोमय्या म्हणाले. नवाब मलिकांचे सारे आरोप हे केवळ पवार कुटुंबियांवर सुरू असलेल्या आयटीच्या धाडी लपवण्यासाठीच, हे घाणेरडं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात, नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही. पवार परिवारानं महाराष्ट्राला खूप लुटलंय, असेही सोमय्या म्हणाले.

HTML tutorial

सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘बिल्डर्सकडून अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आले आहेत. ते पैसे अजित पवार यांनी कुठे-कुठे ट्रान्सफर केले. जावई, बहिण, बायको, मुलगा आणि आईच्या खात्यात अजित पवार यांनी पैसे ट्रान्सफर केले. अजित पवार यांनी घोटाळ्याचे पैसे पूर्ण कुटुंबात ट्रान्सफर केलेत. 19 दिवसांपासून ईडीच्या धाडी सुरु आहेत. हजार कोटींपेक्षा जास्त बेनामी संपत्ती बाहेर आली आहे,’ असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.

अशा लेअर केल्यामुळे आपली चोरी पकडली जाणार नाही, असं पवारांना वाटतेय का? 19 दिवसांपासून ईडी आणि आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. यापासून लक्ष विचलीत व्हावं म्हणून नवाब मलिक यांना पुढे केलं जातेय. नवाब मलिकांची एवढी कपॅसिटी नाही, हे घाणेरडं राजकारण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं आहे. ज्यावेळी समीर वानखेडे यांना नोकरी लागली तेव्हा तुम्ही काय करत होतात? असा सवाल सोमय्या यांनी नवाब मलिक यांना प्रश्न विचारला. फडणवीस यांच्यावर आरोप करत नवीन मुद्दा उकरुन काढलाय. आधी अजित पवार यांच्या बेनामी संपत्तीबद्दल उत्तर द्यावं, असं किरीट सोमय्या म्हणाले. पवार कुटुंबाच्या जावयाच्या खात्यात पैसे कुठून आले अन् कुठे गेले? याचं उत्तर आधी द्यावं, असे सोमय्या म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:15 PM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here