देवेंद्र फडणवीसांवर नवाब मलिकांनी केलेल्या गंभीर आरोपांवर पंकजा मुंडे म्हणाल्या…

0

मुंबई : ड्रग्स प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. मलिकांनी आज सकाळी अमृता फडणवीस आणि त्यानंतर देवेंद्र यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आणि पत्रकार परिषदेत फडणवीसांचे ड्रग पेडलरसोबत संबंध असल्याचा आरोप केला. या आरोपांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नवाब मलिकांचा हा आरोप अत्यंत हास्यास्पद असल्याचं म्हटलं. ‘ज्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात एवढं चांगलं काम केलं, त्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचा आरोप केला जातोय. हा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:15 PM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here