रत्नागिरीमधील युवकांचा साहसी पर्यटनाकडे ओढा; मलंगगड किल्ला सर

0

रत्नागिरी : साहसी पर्यटन म्हटल की मुंबई पुणे या सारख्या शहरांकडे याचा कल जास्त आढळतो. परंतु या म्हणण्याला छेद रत्नागिरी जिल्ह्याने गेल्या 10 वर्षापासुन दिल्याचे आढळते. शालेय विद्यार्थि आणी महाविद्यालयीन तरुण वर्गाचा व सद्याच्या धकाधकीच्या जिवनात नोकरी करणा-या तरुण वर्गाचा सध्या साहसी पर्यटनाकडे कल वाढलेला दिसतो. यामध्ये पावसाळ्या मध्ये अनेक धबधबे पहाणे. या धबधब्यांमधुन रॅपलिंग सारख्या साहसाचा अनुभव घेणे. छत्रपती शिवाजी महाराज्यांचे गडकिल्ले पहाणे, ऐतिहासिक पदभ्रमंती यामध्ये पन्हाळा ते विशाळगड सारख्या पावसाळ्यातील पदभ्रमंती मोहिमा यांचा समावेश होतो. कोकणात पर्यंट वाढल्याशिवाय रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध होणार नाहीत. पर्यटनात सहभागी होणारे दोन प्रकारचे गट असतात त्यापैकी एक 50 ते 75 या वयोगटातील व्यक्की, दुसरा 20 ते 50 पर्यंतच्या वयोगटातील. यातील 50 ते 75 वयोगटातील व्यक्तींना धार्मिक, ऐतिहासीक, नैसर्गिक अशा गोष्टी पहायला आवडतात की त्यांच्या वयोमानानुसार ज्या सहज रित्या पहाता येतील. परंतु 20 ते 40 या तरूण वयोगटातील मुल व तरूणांना साहसी गोष्टी अनुभवायला आवडतात. याचा आभ्यास करता प्रामुख्याने कोकणात साहसी पर्यटनाला वाव देण्यासाठी जिद्दी माउंटेनेरिंग या संस्थेने अनेक साहसी ट्रेक आयोजनाला सुरवात केली. हे साहसी पर्यंटन संपुर्ण देशात आणी विदेशात देखील अनेक युवकांपर्यंत Trek-Diary Marathi Vlog या युट्युबच्या माध्यमातुन पोहोचवण्याच काम श्री. उमेश गोठिवरेकर हे करत आहेत. याचाच भाग म्हणून दि 24 ऑक्टोबर रोजी कोकणातील तरूणांनी जिद्दी माउंटनेरिंग संस्थेच्या माध्यमातुन कल्याण जवळचा, ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यांत कठीण समजला जाणारा मलंगगड हा किल्ला सर केला. या मोहिमेत एकुण 25 जणांनी भाग घेतला. मलंगगड या किल्ल्या वरील बालेकिल्ला या ठिकाणी पोहोचणे अत्यंत कठिण आणी खडतर मानले जाते. यामध्ये तुमच्या चिकाटीचा, तुमच्यातल्या आत्मविश्वासाचा, जिद्दीचा कस लागतो. किल्यावर जाताना अभेद्य कातळात कोरलेल्या 95 अंश कोनात सरळ उंच असलेल्या अरूंद पाय-या चढून तुम्हाला याच्या प्रवेश द्वारा जवळ पोहोचता येत. त्यांनतर बालेकिल्ल्याकडे जाण्याचा अत्यंत खडतर प्रवास सुरू होतो. या ठिकाणी जाण्यासाठी साधारण 1 ते दिड फुट रुंदिच्या कातळ कड्याच्या बाजूने पाय-या तयार करण्यात आल्या आहेत. या मधिल 40 ते 50 फुटांचा एका पाय-यांचा भाग असणारा डोंगराचा संपुर्ण कडाच कोसळल्याने या भागातील काही पाय-या नष्ट झाल्या असल्याने या ठिकाणी 40 ते 50 फुट लोखंडी आडवा पाईप टाकण्यात आला आहे. त्यात हा पाईप खालुन वर असा तिरका असल्याने या पाईप वरून चालत जाण्याचा थरार अनुभवणे म्हणजे ट्रेकर्स ना पवर्णीच असते. परंतु ट्रेक आयोजक यासाठी सर्व प्रकारची सुरक्षिततेच्या साधनांचा वापर करून या ठिकाणी जात असतात. प्रत्येक सदस्याला क्लायंबिंग साठी आवश्यक असणारी सुरक्षिततेची साधने दिली जातात. यामध्ये सिट हार्नेस, कॅरॅबिनर, डिसेंडर, रोप इत्यादींचा समावेश आहे. नेणा-या संस्थेमध्ये क्लायंबिंगचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतलेले सदस्य असल्याने कोणताही धोका निर्माण होत नाही. ग्रुपची शिस्त अशा ट्रेक मुळे ट्रेकर्स ना पुढील आयुष्यात जगताना एक मार्गदर्शक ठरते. या मलंलगगडावर सर्व ठिकाणी चढाई करताना अनेक ठिकाणी 90 ते 100 अंशात देखील खडतर चढाई आहे. अरूंद वाटा पार केल्या नंतर या अवघड चढाई नंतर, आलेला ट्रेकर्स किल्ल्याच्या माथ्यावर जेव्हा पोहोचतो तेव्हा त्याच्या चेह-यावरील आनंद हा द्विगुणीत होतो. किल्ल्यावर सध्या एक वास्तु आहे. जिचा वापर पुर्वीच्या काळी अन्नधआन्य साठवण्यासाठी कोठार म्हणून किंवा रहाण्याचे ठिकाण म्हणून केला जात असावा. या किल्ल्यावर पाण्याची 7 टाकी आहेत. या ठिकाणचा दगड काढून या वास्तु आणी गडाची तटबंधी बांधली गेली असावी. या ट्रेक मध्ये मलंगगड पायथा ते माथ्य़ा पर्यंतची जवळ जवळ 10 कि. चढाई चालायला लागते हे त्यावेळी सावलेल्या गुगल मॅप वरून दिसुन आले. परतीच्या वेळी यातील पाईप क्रॉसिंगच्या ठिकाणा वरून सर्व सदस्यांनी 150 फुट पॅपलिंग करत रॅपलिंगचा थरार देखील अनुभवला. या ट्रेक मध्ये सुजू पटवर्धन या 8 वर्षाच्या मुलाचा सहभाग व त्याच्या लिलया चढाईची दृष्य इतर सहभागी तरूणांचा उत्साह वाढवणारी ठरली. अशा रोमहर्षक थ्रिलिंग ट्रेक, भटकंती, पर्य़टनाकडे सध्या लोकांचा वाढता कल आहे. कोकणात देखील अशी अनेक ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी उन्हाळ्यात देखील धबधबे प्रवाहित आहेत. या ठिकाणी देखील या ग्रुपच्या माध्यमातुन ट्रेकर्सना साहसी पर्यटनाची संधी उपलब्ध झाली आहे. या व अशा निरनराळ्या पर्यटना संदर्भातील अनेक व्हिडिओ Trek-Diary Marathi Vlog या युट्युब चॅनलवर पाहू शकता.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:06 PM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here