सौदी अरेबियन कोळंबी आणि ब्राझिलियन गोमांसामुळे कोरोना तयार झाला;चीनचा अजब दावा

0

बीजिंग : चीनची सरकारी माध्यमे कोरोना व्हायरस संदर्भात एक नवीन सिद्धांत मांडत आहेत. एका संशोधकाच्या मते, या सिद्धांतानुसार ब्राझीलमधील गोमांस, सौदी अरेबियाची कोळंबी आणि अमेरिकेचे लॉबस्टर-पोर्क मीट हे कोरोना विषाणू पसरण्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक थिंक टँक पॉलिसी रिसर्च ग्रुपसाठी प्रचाराचे संशोधन करणारे मार्सेल स्लेब्स यांनी चीनच्या अजेंड्याला समर्थन देणाऱ्या शेकडो खात्यांचा अभ्यास केला आहे. मार्सेल म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी निर्यात केलेल्या थंड मांसाच्या सिद्धांताला पुढे नेणाऱ्या चीनच्या अजेंड्याला समर्थन देणारी शेकडो खाती समोर आली आहेत. चिनी माध्यमांना ब्राझीलमधील बीफ, सौदी अरेबियातील कोळंबी आणि अमेरिकेती डुकराचे मांस आणि लॉबस्टर कोरोना विषाणूच्या प्रसाराचे कारण असल्याचे सिद्ध करायचे आहे. चीनमधील वुहान शहर आणि तेथील दूषित मांसामुळे कोरोना तयार झाला, या आरोपांना खोटं सिद्ध करण्यासाठी चीन या नव्या सिद्धांताचा प्रचार करत असल्याचे दिसत आहे. ग्लोबल थिंक टँकच्या मते, स्लेब्सने 18 महिन्यांच्या कालावधीत चीन समर्थक खात्यांच्या ट्विटर फीडचे विश्लेषण केले आणि आढळले की मेन लॉबस्टरचा सिद्धांत कोलकातामधील वाणिज्य दूतावासात तैनात असलेल्या चिनी अधिकाऱ्याने सादर केला होता. अहवालात म्हटले आहे की, “झा लियूने नोव्हेंबर 2019 मध्ये हा सिद्धांत पोस्ट केला आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला. पण, रोग नियंत्रण केंद्राने स्पष्टपणे सांगितले आहे की, हे दावे तथ्यांवर आधारित नसल्याचे म्हटले आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:05 PM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here