वसुबारस च्या दिवशीच गोमातेची तस्करी करणाऱयांना पकडले

0

साखरपा : दिनांक १-११-२१ रोजी सर्व दिवाळिच्या तयारित असतानाच वसु बारस हा सण मोठ्या प्रमाणावर गाईंचे, वासरांचे पुजन करुन साजरा केला जातो अन याच पवित्र दिवशी पुजन केल्या जाणाऱ्या गाईच कत्तलखान्यात जाताना सापडल्या हे दुर्दैव. दाभोळे गावानजिक गाडी न. MH11AG4379 ही गाडी गोवंश घेऊन जात असल्याची माहीती मिळताच हिंदुराष्ट्र सेना व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे कार्यकर्ते तिथे पोहचले व गाडी पकडली असता त्यामधे दोन गाई व एक वासरु असा गोवंश बेकायदेशिर रित्या वाहतुक करताना सापडला. सदर गोवंश व चालक सोनी यास पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले व याचे दोन साथिदार फरार झाले. सदर व्यक्तिवर गुन्हा नोंद झाला असुन. गुन्हा नोद होत असतानाच पोलीस चेक पोस्ट मुर्शी समोरुनच दुसरी गाडी न. Mh09FL2838 ही गुरे घेऊन जात असताना पकडली व यातिल चालक रझाक काझी व त्याचा सहकारी साताब आदमापुरे यांना पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढिल कारवाइ पोलीस करत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाले होते. सदर व्यक्तींवर व यामध्ये सामिल असलेल्या दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी हिंदुराष्ट्र सेना व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सागर कदम, चंद्रकांत राऊळ, प्रनित दुधाने, गणेश गायकवाड, सुशिल कदम, सागर विचारे, अक्षय लाखण, सुरज शिर्के, धनंजय कणावजे, संतोष केळकर, सागर वैध, अजय पवार, निखिल भोसले व इतर उपस्थित होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here