चिपळुणात महिलेची 5 लाखांची फसवणूक; दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल

0

चिपळूण : शहरातील गोवळकोट रोड येथे राहणाऱ्या सेहर आसिफ कडवईकर या महिलेची पाच लाखांची फसवणूक झाली आहे. दागिने गहाण ठेवल्याच्या बदल्यात सातत्याने व्याज भरून ही फसवणूक झाली आहे. या प्रकरणी सायना शब्बीर मेमन (रा. गोवळकोट रोड) व राधा लवेकर या महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला असून ही घटना ८ फेब्रुवारी ते १५ सप्टेंबर या कालावधीत घडली आहे. फिर्यादी सेहर कडवईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कडवईकर यांनी आयआयएफएल फायनान्स कंपनीत सोन्याचे दागिने गहाण ठेवून ४५ हजार रूपये व्याजाने घेतले. याच दरम्यान वेगवेगळ्या स्वरूपात फिर्यादीने दोन महिला आरोपींना ५ लाख ८ हजार १५८ रुपये वेळोवेळी दिले. या प्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:13 PM 02-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here