जिल्हा बँक संचालकपदी दिशा दाभोळकर बिनविरोध

0

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा बँकेच्या संचालकपदी जि. प. सदस्या व राष्ट्रवादीच्या युवती जिल्हाध्यक्षा यांची बिनविरोध निवड झाली आहे. या जागेसाठी रिंगणात उभ्या असलेल्या सौ. बाईत या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्याने दिशा दाभोळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे डॉ. तानाजी चोरगे यांच्या पॅनेलची ताकद वाढली आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध दिशा दाभोळकर व्हावी यासाठी विद्यमान अध्यक्ष डॉ. चोरगे यांनी सर्वपक्षीयांचे एकमत करून बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या त्यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी पक्षातूनच मोठा विरोध झाला. चिपळूण राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी सहकार पॅनेलविरोधात स्वतंत्र पॅनेल उभे करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर दिशा दाभोळकर यांची निवड महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांच्या यशाबद्दल खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, पं. स. सदस्य नितीन ठसाळे, आ. शेखर निकम, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:03 PM 02-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here