मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे, प्रकल्प आणि विविध योजनांचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग जिल्हा बैठकीत त्यांनी तिलारी प्रकल्प संवर्धन व राखीव करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी त्यांनी मसुरे लघु पाटबंधारे योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच जिल्ह्यांतील रिक्त पदांचा आढावा घेवून ती भरण्याची कार्यवाही करण्याचे व कबुलायतदार आणि आकारीपड जमिनींबाबत एकत्रित बैठक घेवून निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत.
