जुनी पेन्शन योजना शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत शिक्षक परिषदेचे निवेदन

0

रत्नागिरी : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग यांच्यातर्फे सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष किरण देशपांडे, चंद्रकांत पुराणिक, राजेंद्र आयरे उपस्थित होते. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय वित्त विभाग ३१ ऑक्टोबर २००५ व शासन निर्णय शिक्षण विभाग दि.२९ नोव्हेंबर २०१० अन्वये १९८२ जुनी पेन्शन योजना लाभापासून वंचित केले आहे. लवकरात लवकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करुन शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील याआधी निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून देण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:05 AM 03-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here