भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याच्या वतीने शासकीय कार्यालयांत उटणे वाटप

0

गुहागर : रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा संयोजक संतोष जैतापकर यांच्या माध्यमातून गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुहागर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दीपावलीच्या निमित्ताने उटणे वाटप करण्यात आले. यामध्ये गुहागर तालुका पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभाग, तहसील कार्यालय, पोलिस ठाणे. सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमिअभिलेख कार्यालय, बँक ऑफ इंडिया कार्यालय, गुहागर नगर पंचायत कार्यालय, गुहागर तालुका कृषी विभाग, गुहागर येथील ग्रामीण रुग्णालय, गुहागर तालुका पत्रकार संघ इत्यादी ठिकाणी गुहागर भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, गुहागर नगर पंचायतीतील भाजपचे गटनेते उमेश भोसले, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संजय मालप यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उटणे वाटप करण्यात आले. दीपावलीच्या निमित्ताने संतोष जैतापकर आणि भारतीय जनता पार्टी तालुका गुहागर यांनी उटणे वाटप केल्याबद्दल शासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी समाधान व्यक्त केले. भाजपच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 03-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here