दापोलीत दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ

0

दापोली : दापोली शहरात आणि शहरालगतच्या भागातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. दि. २९ आणि ३० ऑक्टोबर या दोन दिवसांत दापोली एस.टी. स्टैंड आणि जालगाव येथून दोन दुचाकी चोरट्यांनी चोरल्या आहेत. या आधीदेखील दापोली शहरातून आणि वाकवली परिसरातून दुचाकी चोरीला गेल्या आहेत. मात्र, त्या अद्याप सापडल्या नाहीत. दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने आता नागरिकांच्या वाहनांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. दापोली शहरात ग्रामीण भागातून कामकाजासाठी अनेक लोक येतात. पार्किंग साठी जागा मिळेल तिथे वाहने पार्किंग करतात. मात्र वाहन चोरीमुळे आपली वाहने नेमकी कुठे ठेवावीत, असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. दापोली एस.टी.स्टैंड परिसरात पार्किंग केलेल्या दुचाकी चोरीला जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे या दुचाकी चोरांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. दापोली शहरात रात्री अनावश्यक फिरणाऱ्या टोळक्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे अशा टोळक्यांनादेखील कायद्याची जरब बसणे आवश्यक आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:52 AM 03-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here