एल्गार परिषद आणि भीमा कोरेगावबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारले असता, ‘एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. दलित बांधवांशी संबंधित जो विषय आहे तो भीमा कोरेगावचा आहे. दलित बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही तसेच या प्रकरणाचा तपास केंद्राला दिलेला नाही आणि देणारही नाही,’ असे ठाकरे म्हणाले.
