आरोग्य विभागाच्या 25 कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; उद्योजक सौरभ मलुष्टे, हेमंत वणजू यांच्याकडून फराळ वाटप

0

रत्नागिरी : मागील दोन महिने वेतनापासून वंचित असलेल्या आरोग्य विभागातील 25 कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी उद्योजक सौरभ मलुष्टे आणि पत्रकार हेमंत वणजु यांनी दिलेल्या भेटीमुळे गोड झाली. वुमन्स हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी काम करणाऱ्या 25 कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कोविड काळात धोका पत्करून अनेक जण आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत दाखल झाले होते. आता कोरोना आटोक्यात आला असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. काही कंत्राटी कामगार अद्यापही सेवा देत असताना मागील दोन महिने या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आलेले नाही. दोन महिने वेतनाविना असल्याने दिवाळीच्या तोंडावर हे कर्मचारी समस्येत सापडले होते. कोरोना काळात अनेक जणांचे प्राण वाचवणाऱ्या या 25 जणांची दिवाळी गोड व्हावी यासाठी उद्योजक सौरभ मलुष्टे आणि पत्रकार हेमंत वणजु यांनी पुढाकार घेतला. या 25 कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळ भेट म्हणून देण्यात आला. वेतनाच्या चिंतेत असलेल्या या 25 जणांच्या हातात दिवाळी फराळ मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:31 PM 03-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here