पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

0

पंतप्रधान नरेंद्र मोदीं नी यंदाही देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.
यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जाऊ शकतात. पीएम मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळ जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर, पंतप्रधानांच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचं ठिकाण शेवटच्या क्षणी बदललं जाऊ शकतं. दरम्यान, पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जातात, तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची भेट गुप्त ठेवली जाते.

पंतप्रधान मोदी दरवर्षी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. यावेळी पंतप्रधान जवानांसोबत वेळ घालवतात. तसेच त्यांचं मनोधैर्य उंचावण्याचं काम करतात. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमध्येही जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:47 AM 04-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here