महाराष्ट्र दिनाला चिपी एअरपोर्ट सुरू होणार – मुख्यमंत्री

0

सिंधुदुर्गातलं चिपी एअरपोर्ट १ मे रोजी सुरू होणार आहे. १ मेला चिपी एअरपोर्टवर विमान उतरणार असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात कोकणवासियांसाठी ही खुशखबर दिली आहे. 1 मेच्या आत विमानतळाची सगळी कामं पूर्ण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या प्रतिक्षेत अनेक दिवस गेले. परवानग्या न मिळाल्याने कोकणातील चाकरमान्यांची विमान प्रवासाची प्रतीक्षा खूपच वाढली. पण आता 1 मेची तारीख मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. २०१८ मध्ये गणेशोत्सव काळात मोठा गाजावाजा करत चिपी विमानतळावर विमान उतरवण्यात आलं होतं. त्यावेळी येत्या सहा महिन्यात सर्व चाचण्या पूर्ण करून विमानतळ प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. पण या घटनेला अडीच वर्षाहून अधिकचा काळ झाला तरी विमान काही उतरण्याचं नाव घेत नाही. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या एप्रिल-मे महिन्यात आणि गणेशोत्सव काळात मोठी असते. आता लवकरच उन्हाळी सुट्ट्या सुरू होतील सहाजिकच पुन्हा एकदा चाकरमानी विमानाची प्रतीक्षा करतील. या वर्षी तरी मेमध्ये प्रवास विमानाने करता यावा अशी अपेक्षा चाकरमानी व्यक्त करत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here