कोरोनाची धास्ती जगभरात आहे. अशा वेळी भारतात होऊ घातलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धा सुरू होण्यास दोन आठवडे असतानाच चीनने आपल्या ४० सदस्यांची नावे व्हिसासाठी पाठवली होती. त्याचबरोबर संघातील कोणासही कोरोनाची लागण झालेली नाही, असे सांगितले होते. मात्र, भारताच्या आरोग्य तसेच गृह मंत्रालयाने कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळेच केवळ चीनमधून येणारा संघच नव्हे; तर जागतिक महासंघाच्या जीनिव्हा येथील मुख्यालयात काम करणाऱ्या चीनच्या दोघा पदाधिकाऱ्यांनाही व्हिसा नाकारण्यात आला आहे.
