संगमेश्वर तालुका भाजपकडून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना फराळ वाटप

0

संगमेश्वर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २०० हून अधिक कुटुंबांना संगमेश्वर तालुका भारतीय जनता पार्टीने सामाजिक बांधिलकी जपत फराळाचे वाटप केले. कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबांमधील कमावत्या व्यक्ती, घराचे आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड गेले. त्यामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अशा दोनशेहून अधिक कुटुंबांना दीपावलीचे औचित्य साधून फराळाचे वाटप केले. देवरूख भाजपा कार्यालयातून या उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी झाला. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, उपाध्यक्ष अभिजित शेट्ये, मिथुन निकम, देवरुख नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, देवरूख शहराध्यक्ष व नगरसेवक सुशांत मुळे, राजेंद्र गवंडी, यशवंत गोपाळ, तुकाराम किरवे उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 05-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here