आर्यन खान आज एनसीबी कार्यालयात हजेरी लावणार

0

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आज क्रूझ ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ऑफिसमध्ये हजेरी लावणार आहे. आर्यन खान सध्या जामीनावर बाहेर आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार, आर्यनला शुक्रवारी सकाळी 11 ते 2 दरम्यान, मुंबईतील एनसीबी ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी जामीनावर सुटका झाली होती. दरम्यान, आर्यन खानला जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयानं 14 अटी घातल्या आहेत. ज्यांचं पालन आर्यनला करावं लागणार आहे. जर अटींचं पालन आर्यननं केलं नाही तर मात्र त्याचा जामीन रद्द होऊ शकतो.

या 14 अटी

  1. आर्यन खानला एक लाख रुपयांचा पर्सनल बाँड भरावा लागणार आहे.
  2. अशाप्रकारच्या कोणत्याही प्रकरणात पुन्हा सहभागी न होण्याची हमी आर्यनला द्यावी लागणार
  3. या प्रकरणातील कोणत्याही आरोपींसोबत संपर्क साधायचा नाही.
  4. असं कोणतंही काम करु नये, ज्यामुळं त्यांच्यावरील आरोपांवर फरक पडेल.
  5. साक्षीदार किंवा पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करु नये
  6. पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करण्याचे आदेश
  7. माध्यमांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यास मनाई
  8. उच्च न्यायालयानंच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाई
  9. आर्यन खान जर मुंबईतूनही बाहेर जाणार असेल तर याबाबतची माहिती त्यानं या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांना आधीच देणं आवश्यक
  10. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार
  11. कोर्टाच्या प्रत्येक सुनावणी वेळी उपस्थित राहावं लागणार आणि तपासात पूर्ण सहकार्य करणं गरजेचं
  12. प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर चौकशीला विलंब करु नये
  13. अर्जदार/आरोपींना न्यायालयातील प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहावं लागणार
  14. आरोपीनं यापैकी कोणत्याही अटींचं उल्लंघन केलं तर मात्र जामीन रद्द करण्यासाठी एनसीबी विशेष कोर्टात अर्ज करु शकते

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:25 AM 05-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here