‘मनसे’तर्फे कौंढर काळसूर येथे दिवाळीनिमित्त उटणे, पणतींचे वाटप

0

गुहागर : कौंढर काळसूर युवा मनसे सैनिक यांनी गावपातळीवर उटणे आणि पणती वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विश्वास मुधाळे, गुहागर मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्यासह कौंढर काळसुर शाखाअध्यक्ष समीर जोयशी, गट विभाग अध्यक्ष विक्रम जोयशी. उपगट विभाग अध्यक्ष नरेंद्र कदम, उपशाखा अध्यक्ष मनोहर जोयशी, सल्लागार संजय रामाणे, खजिनदार महेश जोयशी तसेच गावातील सर्व मनसे सैनिक यांच्या सौजन्याने कौंढर काळसुर युवा मनसे सैनिक यांनी गावपातळीवर उटणे आणि पणती वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. यावेळी मनसे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर याच्या उपस्थितीत विक्रम जोयशी. शैलेश बामणे. विकास जोयशी, किशोर बामणे, रवींद्र खांडेकर, अंजनवेल विभाग अध्यक्ष तेजस पोफळे, उपविभाग अध्यक्ष स्वप्निल कांबळे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, रुपेश घवाळे उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:54 PM 05-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here