कोकण दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. किल्ले सिंधुदुर्ग येथे देशातील एकमेव अश्या शिवराजेश्वर मंदिर येथे मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. तसेच भवानी मंदिरात भवानी मातेचे दर्शन घेत मुख्यमंत्री नतमस्तक झाले.
