गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जलाशयामध्ये वाढ झाली आहे. दि. ३१ जुलै रोजी सकाळी ८ वाजता कोयना जलाशयाची पातळी २१३५ फुट ५ इंच असून धरणात ७४.८९ टी.एम.सी. एवढा पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून धरण पायथा विद्युतगृहातून सुमारे २१०० क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग सोडावा लागणार आहे. त्यामुळे नदीकाठची गावे, वाड्या व वस्त्यामधील राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सिंचन विभाग कोयनागरचे अभियंता कु. हं. पाटील यांनी लेखी पत्राद्वारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सातारा यांना सुचित करण्यात आले आहे.
