ब्रेकिंग : अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

0

मुंबई : सचिन वाझे 100 कोटी ‘वसुली प्रकरणात’ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. देशमुख यांनी गृहमंत्री असताना १०० कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावली. अनिल देशमुख यांना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनिल देशमुख यांना मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, आता ईडीच्या कोठडीतून देशमुख यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात येईल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:45 PM 06-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here