बंद पडलेली दुचाकी अचानक चालू होऊन एक्सिलेटर वाढल्याने खडीवरून घसरून अपघात; एकाचा जागीच मृत्यू

0

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील दाभीळनजीक गुरुवार, दि. ४ रोजी सायंकाळी दुचाकीच्या अपघातात संजय धोंडीराम आखाडे (३८) हा तरुण जागीच ठार झाला. तो आपल्या दुचाकीवरून सहकारी गणेश जैन यांच्या समवेत मुंबई-गोवा महामार्गावरून जात होता. अचानक दुचाकी बंद पडली रस्त्याच्या बाजूला दुचाकी उभी करुन ती चालू करण्याचा प्रयत्न संजय करत होता. यावेळी दुचाकी अचानक चालू होऊन एक्सिलेटर वाढल्याने दुचाकी खडीवरून पुढे जाऊन आदळली. यामध्ये संजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती गणेश जैन यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:00 AM 08-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here