सुसेरी येथील वृद्धाच्या खूनप्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

0

खेड : तालुक्यातील सुसेरी नं. २ येथील बाळकृष्ण भागोजी करबटे या ६५ वर्षे वृद्धाच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. स्वयम शशिकांत शिंदे, अजय विजय शिंदे, राजेश पांडुरंग टाणकर आणि निलेश पांडुरंग टाणकर (सर्व राहणार सुसेरी नं.२) या चौघांनी सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी ६५ वर्षीय करबटे यांचा खुन केला होता. येथील पोलिसांनी अवघ्या २४ तासांतच खुनाचा छडा लावत चौघांना जेरबंद केले होते. चौघांकडून तीन तोळे सोन्याचे दागिन्यांसह मोबाईल हस्तगत केला. न्यायालयाने दहा दिवस पोलिस कोठडी सुनावली होती. दि. ५ नोव्हेंबर रोजी मुदत संपुष्टात आल्याने पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतचा
अधिक तपास पोलिस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 08-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here