रत्नागिरी : आरटीओ कार्यालयात वाहन नुतनीकरणासाठी बनावट इन्शुरन्स पॉलिसीचा वापर करणाऱ्या दोघा संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नरेंद्र दत्तात्रय विचारे. ५२, रा. चौबुर्जवाडी, हातखंबा व अस्लम अब्बास बोरकर .६०, रा . मुस्लीमवाडी अशी संशयिताचे नाव आहे. ही घटना ११ ते २६ ऑक्टोबर २०१७ ला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय कुवारबाव , रत्नागिरी येथे घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांनी इप्को टोकीयो या कंपनीच्या मोटार वाहन इन्शुरन्सची बनावट पॉलीसी आहे हे माहित असताना पॉलिसीचा वापर स्वत:च्या मालकीच्या वाहनाच्या नुतनीकरण. पासिंग साठी केला. तसेच इप्को टोकीयो इन्शुरन्स या कंपनीची फसवणूक केली. या प्रकरणी तक्रारदार सिद्धेश गजानन आळवे. ३६ ,रा. पाजीफोंड, मडगाव- गोवा यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी दोघा संशयितांवर १० फेब्रुवारी २०१८ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दोघा संशयितांना मंगळवार ३० जुलैरोजी अटक केली. न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. एम. वराळे करत होते.
