उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा कार्यक्रम

0

रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार 09 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.15 वाजता जयगड येथे झालेल्या बोट अपघातासंदर्भात आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) सकाळी 11.00 वाजता रत्नागिरी नगरपरिषद दांडेआडोम घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सकाळी 11.30 ते 01.00 वाजता रत्नागिरी- संगमेश्वर मतदार संघ विकासकामांचा आढावा बैठक ( रस्ते विकास आढावा- नळपाणी योजना-चौक सुशोभीकरण निधी- टिळक स्मारक- गणपतीपुळे तिर्थक्षेत्र विकास व इतर योजनांचा आढावा) (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 01.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथून मोटारीने शिरगांव, ता. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 01.15 वाजता ग्रामपंचायत शिरगांव अंतर्गत विविध विकास कामांचे भूमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शिरगांव, ता.जि. रत्नागिरी). दुपारी 02.00 वाजता शिरगाव येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 02.15 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. दुपारी 03.30 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून मोटारीने चांदराई, ता. रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 04.00 वाजता हरचेरी जि.प. गट कार्यकर्ते मेळावा. (स्थळ : मराठी शाळा, चांदराई, ता.जि. रत्नागिरी). सायंकाळी 05.30 वाजता चांदराई येथून मोटारीने फणसोप कडे प्रयाण. सांयकाळी 06.00 वाजता घोळप जि.प. गट कार्यकर्ते मेळावा. (स्थळ : फणसोप हायस्कूल, फणसोप, ता.जि. रत्नागिरी)सांयकाळी 07.30 वाजता फणसोप येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्रौ 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानक कडे प्रयाण. रात्रौ 10.50 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मडगांव मुंबई फेस्टीवल स्पेशल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:15 PM 08-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here