ना. उदय सामंत आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

0

रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे विविध विकास कामांच्या आढावा बैठकांच्या निमित्ताने दि. ९ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्यानुसार मंगळवार 09 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.15 वाजता जयगड येथे झालेल्या बोट अपघातासंदर्भात आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) सकाळी 11.00 वाजता रत्नागिरी नगरपरिषद दांडेआडोम घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सकाळी 11.30 ते 01.00 वाजता रत्नागिरी- संगमेश्वर मतदार संघ विकासकामांचा आढावा बैठक ( रस्ते विकास आढावा- नळपाणी योजना-चौक सुशोभीकरण निधी- टिळक स्मारक- गणपतीपुळे तिर्थक्षेत्र विकास व इतर योजनांचा आढावा) (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 01.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथून मोटारीने शिरगांव, ता. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 01.15 वाजता ग्रामपंचायत शिरगांव अंतर्गत विविध विकास कामांचे भूमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शिरगांव, ता.जि. रत्नागिरी). दुपारी 02.00 वाजता शिरगाव येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 02.15 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. दुपारी 03.30 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून मोटारीने चांदराई, ता. रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 04.00 वाजता हरचेरी जि.प. गट कार्यकर्ते मेळावा. (स्थळ : मराठी शाळा, चांदराई, ता.जि. रत्नागिरी). सायंकाळी 05.30 वाजता चांदराई येथून मोटारीने फणसोप कडे प्रयाण. सांयकाळी 06.00 वाजता घोळप जि.प. गट कार्यकर्ते मेळावा. (स्थळ : फणसोप हायस्कूल, फणसोप, ता.जि. रत्नागिरी)सांयकाळी 07.30 वाजता फणसोप येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. सोईनुसार शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्रौ 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानक कडे प्रयाण. रात्रौ 10.50 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मडगांव मुंबई फेस्टीवल स्पेशल एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:15 AM 09-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here