शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

0

शिवनेरीवर होणाऱ्या शासकीय शिवजयंतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 101-शिवबा सलामीच्या कार्यक्रमातून अनोख्या पद्धतीने यांचं स्वागत होणार आहे. आदिवासी भागातील तेजुरच्या ठाकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील 51 मुली व तेजुर येथील ग्रामस्थांच्या ढोल ताशा पथकातील 50 माजी विद्यार्थी असे आजी माजी आदिवासी विद्यार्थी 7 मिनिटांचा एक कार्यक्रम सादर करणार आहेत. या शाळेस सादरीकरणाची पाचव्यांदा संधी मिळाली आहे. 50 ढोल ताशे व 51 मुलींचे भगव्या झेंड्यांचे रोमहर्षक संचलन आदिवासी डांगी नृत्यातून सादर करणार आहेत. यासाठी सध्या जोरदार सराव सुरू आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here