‘कोरोना’ व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. चीनचे चलन असलेल्या युआनलाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे, मात्र रुग्णालये, बाजारपेठा, बस, रेल्वेसेवा आदी ठिकाणांहून संसर्ग झालेल्या नोटा चलनात आल्याची शक्यता पीपल्स बँक ऑफ चायनाकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे सुमारे 84 हजार कोटी रुपये मूल्याच्या नोटा नष्ट केल्या जाणार असल्याचे वृत्त आहे.
