पाटपन्हाळे महाविद्यालयात बक्षीस वितरण

0

गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या पाटपन्हाळे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. आर. जी. जाधव यांच्या उपस्थितीत ‘स्वच्छता अभियान’ विषयाच्या अनुषंगाने पोस्टर स्पर्धाचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. प्रमोद देसाई, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. जालिंदर जाधव, प्रा. लंकेश गजभिये, डॉ. सुभाष खोत, डॉ. कृष्णाजी शिंधे, डॉ. प्रवीण सनये, डॉ. दिनेश पारखे, डॉ. प्रसाद भागवत, वरिष्ठ लिपिक सुधीर टानकर, स्नेहल संसारे, विश्वनाथ कदम, ग्रंथपाल धनंजय गरव, ग्रंथालय परिचर पशुराम चव्हाण, नंदकुमार भेकरे, महेश झगडे व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी., सांस्कृतिक व मराठी विभागाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी ‘स्वच्छता अभियान अंतर्गत पोस्टर स्पर्धाचे आयोजन केले होते. यामध्ये स्पर्धेत सिद्धिका सुर्वे प्रथम वर्ष कला हिने प्रथम क्रमांक पटकविला. तस्लीम मनियार (तृतीय वर्ष वाणिज्य) हिने द्वितीय, मनाली रांजाणे (द्वितीय वर्ष वाणिज्य) हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजयी स्पर्धकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. जाधव यांच्या हस्ते अनुक्रमे १ हजार ५०१, एक हजार एक व ५०१ रुपये व प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव यांनी स्वच्छ भारत घडावा यासाठी प्रत्येकाने आपल्या घरात व घराच्या परिसरातील स्वच्छता ठेवली पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आदर्श महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, असे सांगितले. पोस्टर स्पर्धेचे परीक्षण पाटपन्हाळे हायस्कूलचे कलाशिक्षक सुनील मेटकरी, तळवली हायस्कूलचे कलाशिक्षक श्रीनाथ कुळे यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. जालिंदर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रमोद देसाई यांनी आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:27 PM 09-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here