मिरजोळेत हातभट्टीच्या दारू धंद्यावर धाड

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे येथे गावठी हातभट्टीच्या दारू धंद्यावर शहर पोलिसांच्या पथकाने धाड टाकून सुमारे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवार ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आली.
भरत सनगरे (४९, रा. मिरजोळे,) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात सहायक पोलिस फौजदार भगवान शंकर पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मिरजोळे येथील जंगलमय भागात वहालाच्या कडेला संशयित गावठी हातभट्टी दारुसाठी लागणारे साहित्य बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. यात ८ हजार ८०० रुपयांचे दोन प्लॅस्टिकचे बॅरल त्यात ४०० लिटर गुळ व नवसागर मिश्रीत कुजके रसायन,४ हजार ३०० रुपयाच्या पत्र्याच्या बॅरलमध्ये २०० लिटर गुळ व नवसागरमिश्रित कुजके रसायन आणि २ हजार ३०० रुपये किमतीच्या पत्र्याच्या बॅरलमध्ये १०० लिटर गुळ व नवसागर मिश्रीत कुजके रसायन व इरत साहित्य असा १६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोलिस नाईक करलकर करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:20 PM 09-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here