आंबव येथील कालीश्री मंदिर भाविकांचे आकर्षण

0

साखरपा : आंबव येथील कालीश्री मंदिरात तयार करण्यात आलेले भव्य म्युरल भाविकांचे आकर्षण ठरत आहे. म्युरल कलाकार कृष्णनाथ पांचाळ यांनी ही कलाकृती साकारली आहे. आंबव येथील कालीश्री मंदिरात एक म्युरल तयार केले आहे. सीपोरेक्स या पदार्थापासून तयार करण्यात आलेले हे भव्य म्युरल पर्यावरणपूरक आहे. पाच फूट उंच आणि १४५ इंच लांबीचे हे म्युरल कलाकार कृष्णनाथ पांचाळ यांनी तयार केले आहे. हे म्युरल तयार करण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागल्याचे पांचाळ सांगतात. दसऱ्याला या म्युरलचे उद्घाटन करण्यात आले. हे म्युरल कायमस्वरूपी मंदिरात बसवण्यात आले आहे. आजपर्यंत अनेक भाविकांनी मंदिराला भेट देऊन या म्युरलचे कौतुक केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:01 PM 09-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here