संगमेश्वर तालुक्यातील पुरातन त्रिपुर दुर्लक्षित

0

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्याला ऐतिहासिक वारसा आहे. तालुक्यात असलेली पुरातन मंदिरे तसेच चालुक्य राजवटीतील मूर्ती व गड पाहण्यासाठी या ठिकाणी मोठया प्रमाणात पर्यटक येत असतात. पुरातन मंदिरासमोर दिसणारे मोठे त्रिपूर आजही दुर्लक्षित असून त्यांच्या डागडूजीसाठी इतिहास प्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. संगमेश्वर तालुक्यात रामेश्वर पंचायतन, सोमेश्वर तसेचे कसबा येथील अनेक पुरातन मंदिरे दुर्लक्षित आहेत. या मंदिरांसमोर मोठे त्रिपूर दिसतात. सण अथवा विजय साजरा करण्यासाठी हे त्रिपूर उजळले जायचे. पूर्ण दगडामध्ये असलेले हे त्रिपूर वेगवेगळ्या आकारांनी सुशोभित आहेत. राजवाडी येथील सोमेश्वर मंदिरांसमोरील त्रिपूर त्रिपूरारी पोर्णिमेला उजळून निघतात. मात्र, इतर गावातील मंदिरासमोरील त्रिपूर आजही दुर्लक्षित आहेत. या त्रिपुराची डागडूजी करून त्याचे जतन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:37 PM 09-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here