उत्तर रत्नागिरी भा.ज.पा जिल्हाध्यक्ष पदी माजी आ.डॉ.विनय नातू यांची नियुक्ती नक्की करण्याचा निर्णय कोकण प्रभारी भा.ज.पा प्रदेश उपाध्यक्ष आ.प्रसाद लाड यांनी घोषित केले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश संघटन, सरचिटणीस तसेच कोकण संघटन मंत्री, कोकणचे प्रभारी आ.रविंद्र चव्हाण यांचेबरोबर झालेल्या चर्चेनुसार डॉ.विनय नातू यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचे निश्चित झाले असून या संदर्भातील नियुक्तीचे आदेश प्रदेश अध्यक्ष मा आ चंद्रकांत दादा पाटील व संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांच्या आदेशाने आ.प्रसाद लाड यांनी केली, सद्यस्थितीत दोन्ही जिल्ह्यांचा प्रभार अॅड.दीपक पटवर्धन यांचेकडे होता. उत्तर रत्नागिरीचा कार्यभार अॅड.दीपक पटवर्धन हे डॉ.विनय नातू यांचेकडे सुपूर्त करतील, अशी माहिती आ.प्रसाद लाड यांनी दिली व डॉ.विनय नातू यांचे अभिनंदन केले आहे.
