एसटी संप: किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी मोर्चातूनच घेतलं ताब्यात

0

मुंबई : एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने संपकरी आंदोलकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असले तरी एसटीतील कामगार संघटनांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर, दुसरीकडे राज्यभर भाजपा नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होऊन सरकारला इशारा दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. मात्र, हा मोर्चा मंत्रालयावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी किरीट सोमय्या आणि पडळकर यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे एसटी कर्मचारी प्रचंड संतापले असून आमदार निवास परिसरात काही काळ संतापाचं वातावरण पसरलं होतं. तर, दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात जाऊन संपातील कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहोत, आता मागे हटणार नाही, असे म्हटले आहे. किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकर हे आमदार निवासातून बाहेर आले आणि संपकऱ्यांच्या मोर्चात सामील झाले. त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ठाकरे सरकार हाय हाय, एसटीचं विलनीकरण झालंच पाहिजे. अशी घोषणाबाजी कर्मचाऱ्यांनी केली. आम्ही मंत्रालयाच्या दिशेने निघालो आहोत. पण आम्हाला अटक करत आहेत. अनेकदा तुरुंगात जाऊ, पण एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ. कितीही वेळा अटक करा. आम्ही कामगारांना न्याय मिळवून देऊ, असं सोमय्यांनी यावेळी बोलताना म्हटले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:50 PM 10-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here