रत्नागिरी एमआयडीसी कार्यालयावर जप्तीची कारवाई

0

➡ कार्यालयातील संगणक, खुर्च्या, टेबल व इतर सामान करण्यात आले जप्त

HTML tutorial

कार्यकारी अभियंता विभाग रत्नागिरी कार्यालयावर दि. १८ फेब्रुवारीच्या संध्याकाळच्या सुमारास न्यायालयाच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई करण्यात आली. १९९३/९४ साली प्रस्तावित करण्यात आलेल्या निवळी आद्योगिक क्षेत्रातील बंधाराच्या कामामुळे काल हि कारवाई करण्यात आली. बंधाऱ्याच्या कामाचा ठेका दिल्यावर त्याचे अर्धे काम झाल्यावर कालांतराने निवळी औद्यगिक क्षेत्र रद्द करण्यात आले. यामुळे ठेकेदार कोळवलकर गुप्ते यांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. याबाबत सुमारे ४ कोटी रुपये भरण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. एमआयडीसी कार्यालयाकडून १० फेब्रुवारीला पैसे भरतो असे देखील सांगण्यात आले होते. मात्र सबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले शिवाय वरिष्ठ कार्यालयातून कोणतीही मदत न मागितल्याने एमआयडीसी कार्यालयावर हि नामुष्की ओढवल्याचे बोलले जात आहे. जप्तीचे येणारे संकट माहित असताना देखील कोणतीही तरतूद न करता काल रत्नागिरी जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी अधिकारी सिंधुदुर्गात रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here