निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। या भूमंडळीचे ठायी। धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हा कारणे। कित्येक दृष्ट संहारिले। कित्येकासी धाक सुटले। कित्येकासी आश्रय जाले। शिवकल्याण राजा।।’ अशी महाराष्ट्राचे नाव सुवर्ण अक्षरांत कोरणारी, महाराष्ट्राचा अभिमान असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शतशः प्रणाम !
