‘उद्धव ठाकरे खासगी रुग्णालयात उपचार घेतात, म्हणजे सरकारी हॉस्पीटल चांगले नाहीत’ : चंद्रकांत पाटील

0

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात माहिती दिली. कोरोनाच्या लढाईत राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शारिरीक त्रासाबद्दल माहिती दिली. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्याचे मुख्यमंत्री कसे काय खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल होतात, याचा अर्थ सरकारी रुग्णालये चांगली नाहीत, हे तुम्ही मान्य करता. देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाला तेव्हा त्यांनी सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार घेतले. मला खासगी विषयात जायचं नाही, पण ज्याठिकाणी मुख्यमंत्री दाखल असतील, तिथे जाऊन तहसालीदार, कलेक्टर यांनी निवेदन पोहोचवावे. राज्याने 9 टक्के सेस आणि 24 ते 25 टक्के व्हॅट कमी करावा, अशा शब्दात पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:34 PM 11-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here