मुंबई : पुण्यातील वक्फ बोर्डाच्या कार्यलयावर छापे पडलेले नाही. ईडीचे छापे पुण्यातील एका ट्रस्टवर पडल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. ईडीच्या छापेमारीबाबत मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. मंत्री नवाब मलिक म्हणाले, काही माध्यमांनी नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा लागल्याच्या बातम्या केल्या. या बातम्या खोट्या आहेत. ईडी माझ्या घरी आली तर त्यांचं मी स्वागत करेल. आमच्या क्लीनअप अभियानात ईडी सहभागी होत असेल तर आम्ही त्याचे स्वागत आहे, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:40 PM 11-Nov-21