टी-20 वर्ल्ड कप: दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया पाकिस्तानवर भारी; रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनं विजय

0

टी-20 विश्वचषक 2021च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या संघानं पाकिस्तानवर 5 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं ऑस्ट्रेलियासमोर 176 धावांचे आव्हान ठेवलं होतं. दरम्यान, हा सामना पाकिस्तानच्या बाजुनं झुकत असताना मॅथ्यू वेडच्या आक्रमक फलंदाजी केली. ज्यामुळं या सामन्याचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूला लागला. ऑस्ट्रेलियाचा संघ येत्या 14 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात नाणेफेक गमवल्यानंतर पाकिस्तानकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुहम्मद रिझावा (52 धावा 67), बाबर आझम (34 बॉल 39 धावा), फखर जमान (32 बॉल 55 धावा, नाबाद), आसिफ अली (1 बॉल 0 धावा), शोएब मलिकनं 2 बॉलमध्ये 1 धाव केली. ज्यामुळं पाकिस्तानच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून मिचेल स्टार्कनं 2 विकेट्स मिळवल्या. तर, पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांना प्रत्येकी एक- एक विकेट्स मिळाली. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून डेव्हिड वॉर्नर (30 बॉल 49 धावा), अॅरोन फिंच (1 बॉल 0 धावा), मिचेल मार्श (22 बॉल 28 धावा), स्टीव्हन स्मिथ (6 बॉल 5 धावा), ग्लेन मॅक्सवेल (10 बॉल 7 धावा), मार्कस स्टॉयनिस (31 बॉल 40), मॅथ्यू वेडनं 17 बॉलमध्ये धमाकेदार खेळी करीत 41 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं एक षटक राखून पाकिस्तानवर विजय मिळवलाय. पाकिस्तानकडून शादाब खाननं 4 विकेट्स घेतल्या. तर, शाहीन आफ्रिदीला एक विकेट्स मिळाली.
या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या संघानं टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. येत्या 14 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंडच्या संघाशी भिडणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर हा सामना पार पडणार आहे. न्यूझीलंडच्या संघासमोर ऑस्ट्रेलियाच्याचं मोठं आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघानं टी-20 विश्वचषकाची एक ट्रॉफी जिंकली आहे. तर, न्यूझीलंडच्या संघाला आतापर्यंत एकही टी-20 विश्वचषक जिंकता आला नाही. या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विरुद्ध संघाला पराभूत करून न्यूझीलंड इतिहास रचण्याचा प्रयत्न करणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:03 AM 12-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here