रायपाटण येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात उत्सव

0

राजापूर : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही तालुक्यातील रायपाटणमधील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरातील उत्सव रविवार दि. १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत होणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तही कार्यक्रम होणार आहेत. रायपाटण येथील विठ्ठल मंदिरात तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये रात्री आरत्या, प्रदक्षिणा, कीर्तन, कार्तिकी एकादशीच्या दिवशी दर्शनयोग, सायंकाळी भजनाचा कार्यक्रम, रात्री भव्य दिंड्या, अखेरच्या दिवशी दपारी महाप्रसाद, सायंकाळी काल्याचे कीर्तन, रात्री आरती, भजन, प्रदक्षिणा आणि पहाटे लळिताचा कार्यक्रम होणार आहे. याव्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी गावातील संगनाथेश्वर मंदिरातील महाप्रसादासह रात्री त्रिपुराचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी कार्तिक एकादशीला या मंदिरात मोठे जत्रेचे स्वरुप प्राप्त होते. रात्री रायपाटणमधील विविध वाड्यांमधून दिंड्या मंदिरात येतात, हरीनामाचा गजर होतो. प्रती पंढरपूरचे स्वरूप येथे पहावयास मिळते. पूर्व परिसरातील भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. दरवर्षी रायपाटणमधील श्री विठ्ठलरखुमाई मंदिरात भव्य उत्सवाचे आयोजन केले जाते. मंदिराचा न्यास असून मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम देखील हाती घेण्यात आले असून, भव्य दिव्य मंदिर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:51 PM 12-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here