टी20 वर्ल्ड कप: पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू मायदेशात न जाता पोहचले दुसऱ्याच देशात; जाणून घ्या कारण

0

पाकिस्तानचा विजयरथ ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत अडवला. ग्रुप २ मधील पाचही सामने जिंकून उपांत्य फेरीत धडकणाऱ्या पाकिस्तानला आता कुणीच अडवू शकत नाही, असा दावा त्यांच्या माजी खेळाडूंनी केला. पण, ऑस्ट्रेलियानं त्यांची हवा काढली. १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियानं ५ विकेट्स व १ षटक हातचे राखून पार केले. डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉयनिस व मॅथ्यू वेड यांनी दमदार खेळ केला. हसन अलीकडून सुटलेला झेल सामन्यातला टर्निंग पॉईंट ठरला. पाकिस्तानच्या कामगिरीवर त्यांच्या चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात पाकिस्तानी खेळाडू मायदेशात न जाता ढाका येथे पोहोचले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ही माहिती दिली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाकिस्तानचा संघ १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यासाठी शनिवारी ढाका येथे दाखल झाले. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली हा संघ येथे तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिली कसोटी २६ नोव्हेंबरपासून चत्तोग्राम येथे, तर दुसरी कसोटी ४ डिसेंबरपासून ढाका येथे खेळवली जाणार आहे. पण, संघासोबत कर्णधार बाबर व अनुभवी खेळाडू शोएब मलिक आलेला नाही. ते १६ नोव्हेंबरला ढाका येथे दाखल होतील, असे पीसीबीनं स्पष्ट केलं. बांगलादेश दौऱ्यासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातील खेळाडूच कायम ठेवले गेले आहेत, अनुभवी खेळाडू मोहम्मद हाफिज यानं PCBकडे विश्रांती मागितली असल्यानं तो मायदेशात गेला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:37 PM 13-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here