शिवजयंतीच्या निमित्ताने ना. उदय सामंतांनी घेतला महत्वाचा निर्णय

0

रत्नागिरी : मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची डागडुजी व परिसराचे सुशोभिकरण हि शिवप्रेमी जनतेची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. याच मागणीला अनुसरून ना उदय सामंत यांनी आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णया नुसार रत्नागिरीतील जनतेला विश्वासात घेऊन त्यांची मतं विचारात घेऊन रत्नसिंधू योजनेअंतर्गत अथवा जिल्हा नियोजन मधून निधी घेऊन मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महराजांचा नवीन पुतळा बसवण्याची योजना आहे. इतिहासकालीन संदर्भांचा अभ्यास करून, तज्ञांची मतं विचारात घेऊन महराजांचा एक तेजस्वी पुतळा या ठिकाणी उभारावा असा संकल्प करण्यात आला आहे. शिवाय या परिसराचे सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे. याचसोबत जिल्हा रूग्णालयाजवळील बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा येथील सर्कल, जयस्तंभ, लक्ष्मी चौक येथील वीर सावरकरांचा पुतळा येथील सर्कलचे देखील सुशोभिकरण करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here