वांझोळे येथील शिवसैनिकांचा ‘मनसे’त जाहीर प्रवेश

0

देवरुख : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे संगमेश्वर तालुका संपर्क अध्यक्ष श्रीपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे विभागातील शिवसेना/राष्ट्रवादी पक्षातील युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शुक्रवारी जाहीर प्रवेश केला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष अनुराग, कोचीरकर, सागर संसारे, ऋतुराज देवरुखकर, अक्षय झपले, शेखर नलावडे यांसह संघटनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. प्रवेश कर्त्यांमध्ये मविक पाटील,हरेश मिरगल, ऋत्विक शिवगण, रोहन झोरे, पवन पाटील, अक्षय पाष्टे, रोहित गायकवाड, विकास तटकरे, अक्षय चव्हाण, रोहित आग्रे, रमाकांत पवार, विजय पाष्टे, प्रशांत गेल्ये, रोहित झोरे, यश गुरव, सुजय कुळये, रोहित गुरव, प्रणव मिरगल, समित पाष्टे, कल्पेश मिरगल, रोहन वाजे यांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:20 PM 13-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here