भाजप नेते विलास पेडणेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

0

राजापूर : आमदार राजन साळवी व शिवसेना पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन राजापूर भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक विलास पेडणेकर यांनी रत्नागिरी येथे आ. साळवी व उद्योजक किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आतापर्यंत राजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता पेडणेकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राजापूर न.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. प्रवेशप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शहरप्रमुख संजय पवार, उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, रत्नागिरीचे नगरसेवक निमेश नायर, विभागप्रमुख गणेश तावडे, गटनेते विनय गुरव, नगरसेवक अनिल कुडाळी, सौरभ खडपे, गोविंद चव्हाण, उपविभागप्रमुख नितेश सावंत, उपशहरप्रमुख उमेश कोळवणकर, बापू शिंदे व मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:12 PM 15-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here