मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका; एसटी कर्मचारी आणि संघटनांना शरद पवारांचं आवाहन

0

नाशिक : एसटी संपाचा आज नववा दिवस आहे. एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी 9 दिवसांपासून कामबंद आंदोलन करत आहेत. मागील 8 दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पण अजूनही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी आज एसटी कामगार आणि संघटनांना आवाहन केलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाला नाशिकमध्ये सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. शरद पवार म्हणाले की, सध्या राज्य सरकारची आर्थिक स्थिती गंभीर आहे. एसटीचा संप सुरू आहे, त्यामुळे मागण्या योग्य असतील असतील तरच त्याची मागणी करा. मागण्या मान्य करणाऱ्यांनी मागण्यांमागची भावना समजून घ्यावी. मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका, असं आवाहन शरद पवारांनी नाशिकमध्ये केलंय.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:45 PM 15-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here