जि. प. आदर्श शाळा पावस नं.१ शाळेने दिली क्षेत्रभेटीतून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

0

पावस: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पावस नं.१, ता.रत्नागिरी शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट अंतर्गत जवळील पूर्णगड किल्ल्याला भेट दिली. या वेळी मुलांनी किल्ल्यावर फेरफटका मारून किल्ल्याच्या परिसराचे निरीक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आणि गड किल्ल्यांची ओळख व्हावी तसेच गड किल्ल्यांचे संवर्धन कसे करावे हा प्रमुख हेतू या भेटीमध्ये होता. मुलांनी अतिशय उत्साहाने सदर उपक्रमात भाग घेऊन खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केली. यावेळी उपस्थित शिक्षक सौ.मानसी कुबडे, सौ.साक्षी कदम, श्री गंभीरानंद मदने, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिजित डोंगरे, उपाध्यक्ष सुधीर देवळेकर पालक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here