लायन्स क्लब रत्नागिरीच्या सामाजिक कार्याची लायन्स इंटरनॅशनलकडून दखल

0

◼️ अध्यक्षा श्रेया केळकर गोल्ड मेडल, सचिव मनाली राणे सिल्व्हर, क्लब च्या खजिनदार डॉ शिवानी पानवलकर यांना प्लॅटिनम अवॉर्ड, तर डॉ संतोष बेडेकर गोल्ड मेडलने सन्मानित

रत्नागिरी : लायन्स क्लब रत्नागिरी च्या 20/21 या वर्षाच्या अध्यक्षा ला श्रेया केळकर सचिव मनाली राणे व खजिनदार डॉ शिवानी पानवलकर यांनी कोरोना काळात सुद्धा केलेल्या सामाजिक कार्याची दखल लायन्स इंटरनॅशनल ने घेतली होती. कोरोना काळात रत्नागिरी शहर व परिसरातील अनेक लोकांना संस्थांना वैद्यकीय आर्थिक मदत करण्यात आली होती. 400 हुन अधिक सेवाकार्य या काळात घेण्यात आली 5 ते 6 लाखाची मदत आर्थिक व वस्तू रुपात करण्यात आली. प्रांता मध्ये सर्वात उत्कृष्ट सामाजिक कार्य करणारा क्लब म्हणून रत्नागिरी क्लब चे नाव घेतले जात आहे. या सर्व कार्याची माहिती लायन्स इंटरनॅशनल ने घेतली व चार राज्यातील क्लब च्या मल्टिपल मधून अध्यक्षा श्रेया केळकर याना गोल्ड मेडल सचिव मनाली राणे यांना सिल्व्हर आणि क्लब च्या खजिनदार डॉ शिवानी पानवलकर यांना प्लॅटिनम अवॉर्ड डॉ संतोष बेडेकर याना गोल्ड मेडल जाहीर करण्यात आले होते. या अवॉर्डस चा कार्यक्रम 13 नोव्हेंबर रोजी शिर्डी येथील साई तीर्थ या भव्य सभागृहात मल्टिपल चेअरमन ला गिरीश मालपाणी डॉ नवल मालू आय डी यांच्या शुभ हस्ते पार पडला. लायन्स च्या सर्व विजेत्या सत्कार महोदयांच्या कार्याचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:20 PM 15-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here