म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत उद्या दूरदर्शनवर

0

मुंबई, दि. १ ऑगस्ट , २०१९ : मुंबई दूरदर्शन च्या महाचर्चा या कार्यक्रमांतर्गत “गृहबांधणी आणि म्हाडा”  या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर उद्या दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५.००  वाजता कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येणार  असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष  श्री उदय सामंत सहभागी होणार आहेत. 

सर्वसामान्यांच्या जीव्हाळ्याची संस्था असलेल्या म्हाडाने गेल्या ७० वर्ष्यांच्या कालावधीमध्ये विविध गृहनिर्माण योजनांन्तर्गत राज्यात सुमारे दहा लाख घरांची निर्मिती केली आहे पैकी २.५ लक्ष घरे हे केवळ मुंबई या शहरातच आहेत. या संस्थेची व्याप्ती लक्षात घेता म्हाडा गृहनिर्मितीच्या क्षेत्रात देशातील अग्रगण्य संस्था ठरते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हाडाच्या या अलौकीक कार्याचा उहापोह होणार तर आहेच पण आगामी काळात गृहनिर्मितीची आव्हाने पेलवण्याकरिता  म्हाडाचे नियोजन काय असणार आहे यावर विस्तृत चर्चा होणार आहे.

म्हाडाचे अध्यक्ष श्री उदय सामंत , निवृत्त सनदी अधिकारी श्री दिनकर जगदाळे आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ श्री जितेंद्र देऊळकर हे प्रामुख्याने या कार्यक्रमात सहभाग घेणार असून श्रीमती मनाली दीक्षित या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करतील. श्री जयु भाटकर यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे.  शनिवार दिनांक ३ ऑगस्ट , २०१९ रोजी रात्री १०. ३० वाजता या कार्यक्रमाचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here